...आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी डोके बाजूला केले नाहीतर घडला असता अनर्थ

Lok Satta 2022-05-16

Views 1

सांगलीमध्ये रविवारी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय निमंत्रित खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी हवेत नारळ उडवून हालगी वादक डोक्याने वरच्यावर फोडण्याची कसरत करीत असताना नारळ वरती उडून गर्दीत खेळ पाहणारे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या दिशेने उडाला. डॉ. विश्वजित कदम यांनी डोके बाजूला केले आणि नारळ खांद्यावर पडला. डोक्यावर बेतलेलं खांद्यावर निभावलं अन्यथा गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले असते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS