‘मी तिजोरीच नाही उघडली तर काय घंटा घेणार?’ अजितदादांची जोरदार टोलेबाजी

Maharashtra Times 2022-03-27

Views 11

अजितदादा हे महाविकास आघडी सरकारमधील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अनेकदा ते विरोधकांवर तिखट शब्दात हल्लाबोल चढवतात. आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहेत. मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? असे म्हणत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना कानपिचक्या दिल्या. कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी निधी वाटपावरून केलेल्या विधानावरुन दत्तात्रेय भरणेंना आपल्या पदाची आठवण करुन दिल्यानंतर एकच हशा पिकला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS