केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबई येथील घरावर महापालिका कारवाई करण्याची तयारी करत असताना आणखी एक फटका हा राणेंना मिळाला आहे. राणेंच्या कोकणातील निलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. राणे कुटुंबीयांनी हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे .तर मुंबई महापालिकेने बंगल्यावर कारवाईची तयारी केल्याने आक्रमक झालेले राणे कुटुंबीय काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.