बिचुकलेनं सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यावर राखी भडकली; म्हणाली, 'त्याने समाधी घेतली'

Maharashtra Times 2022-01-29

Views 3

बिग बॉस १५ शो सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकले बिग बॉसमधून बाहेर पडला. त्या आधी घराबाहेर पडताच कॉन्ट्रव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानवर आरोप केले. सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला, असं म्हणत बिचुकले वादात अडकला. या वक्तव्यावर कॉन्ट्रव्हर्सी क्वीन अभिनेत्री राखी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच राखीनं तिच्या पतीसोबत म्हणजेच रितेश सिंहसोबत मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली 'सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बिचुकलेने समाधी घेतली आहे. सलमान खानवर टीका केल्यानंतर त्याने स्वतःचे नुकसान करून घेतले. 'पुढे राखी म्हणाली, 'माझ्या सलमानबद्दल कोणी काहीही बोलले तर मी त्याला सोडणार नाही. सध्या सहा स्पर्धकांमध्ये येत्या 30 जानेवारीला बिग बॉसचा 15 चा ग्रॅन्ड फिनाले होणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS