हत्तींची कृतज्ञता पाहून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क | पाहा हा वीडियो

Lokmat 2021-09-13

Views 2

आपल्या देशाला विपुल वनसंपत्ती लाभली आहे. सोबत अनेक प्राणी आणि पशुंनी ते भरलेलं आहे.कधी प्राणी शहरात आल्याच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील.केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल ह्या भागात मुबलक प्रमाणात हत्ती पहायला मिळतात. त्यांना पळवण्यासाठी शेतकरी अनेक क्लुप्त्या करतात.परंतु सध्या एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. घटना अशी आहे की नदी ओलांडत असताना एका हत्ती चे पिल्लू चिखलात अडकले. रात्रभर प्रयत्न करून सुद्धा त्याला बाहेर काढण्यात हत्तींना अपयश येत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ह्या घटनेची माहिती वन विभागाला कळली तेव्हा वन अधिकाऱ्यांची टीम तेथे पोहचली. त्यांनी अथक प्रयत्नांनी ता हत्तीच्या पिल्लुला बाहेर काढले. माणसाची ही धडपड हत्ती बाजूला उभे राहून सारे हत्ती बघत होते. आणि माणसांनी जेव्हा त्याला बाहेर काढले आणि तो हत्तींच्या कळपात सामील झाला तेव्हा साऱ्या हत्तींनी सोंड उंचावून चित्कार केला जणू काही ते धन्यवाद देत होते.प्राण्यांकडून खरंच हे शिकण्यासारखे आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS